Thursday, 29 November 2012

Victory............

hiiiiiiii friends

Lovely Winter welcome.....

 Once again a winter with strong cold climate is coming back

"अगामी काळामध्ये 'संविधान पार्टी, महाराष्ट्र आणि मित्र पक्ष एम आय एम' काँग्रेसला आणि प्रस्थापितांना भुईसपाट करून टाकेल"

 "मित्रहो हि तुमची शक्ती आणि तरुणांची शक्ती, जर एकत्र उभी 

राहिली तर,भिकेच्या बळावरती नाही...तर या २०१४ मध्ये तुमच्या 

मतांच्या बळावरती"बाबासाहेबांचा लेक" म्हणून, या राज्याच्या 

विधानसभेमध्ये जाण्याची माझी भुमिका आहे".......
                 
             सुरेशदादा गायकवाड, अध्यक्ष, संविधान पार्टी,महाराष्ट्र





भारत सरकार ची इंदू मिल बाबत जाणून बुजून टाळाटाळ

              स्मारकासाठी इंदू मिलची जागा मिळणे अवघड!
 डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासाठी मुंबईतील इंदू मिलची जागा देण्यास केंद्रीय वस्त्रोद्योग खात्याने अद्याप अनुमती दिलेली नाही. या जमिनीच्या मोबदल्याचा आर्थिक भार कोणी उचलायचा या मुद्दय़ावर निर्णयाचे गाडे अडले आहे. परिणामी महापरिनिर्वाण दिनापूर्वी ही जागा स्मारकाला मिळणे कठीण असल्याचे चित्र आहे.
स्मारकासाठी इंदू मिलची साडे बारा एकर जमीन मिळावी, अशी रिपब्लिकन नेते रामदास आठवले यांची मागणी आहे. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनीही त्यासाठी केंद्राला विनंती केली आहे. त्यावर पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी गेल्या वर्षाच्या अखेरीस त्याचा विचार करून जमीन देण्याची प्रक्रिया पूर्ण करावी, असे वस्त्रोद्योग मंत्रालयाला सांगितले होते. 
स्मारकासाठी ५ डिसेंबरपर्यंत जमीन मिळाली नाही तर दुसर्‍या दिवशी महापरिनिर्वाण दिनी रिपब्लिकन कार्यकर्ते मिलमध्ये घुसून ताबा घेतील, असा इशारा आठवले यांनी दिला आहे. प्रसंगी बलिदान देण्याची ५00 तरुणांची तयारी असल्याचे आठवले यांनी आज ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. 
तोवर या प्रश्नाकडे देशाचे लक्ष वेधण्यासाठी उद्या, गुरुवारी दुपारी १ वाजता संसदेवर मोर्चा नेणार असून त्यात ५0 हजार कार्यकर्ते सहभागी होतील असे आठवले यांनी आज सांगितले. मोर्चानंतर पक्षाचे शिष्टमंडळ पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग, कृषी मंत्री शरद पवार, गृहमंत्री सुशील कुमार शिंदे, वस्त्रोद्योग मंत्री आनंद शर्मा यांना निवेदन देणार आहे.

इंदू मिल मधील डॉ. आंबेडकर स्मारकाचा आराखडा सरकारला सादर



आंबेडकर स्मारक

३६० फुटाचा डॉ. आंबेडकर यांचा पुतळा
बाबासाहेबांचे स्मारक दादरकरांसाठी ऑक्सिजनचे बेट
मुंबई/अजेयकुमार जाधव (http://jpnnews.webs.com
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे इंदू मिलवर स्मारक कसे असावे याबाबत वास्तुरचनाकार सौरभ चटर्जी यांनी तयार केलेला या स्मारकाचा भव्य आराखडा रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांनी राज्य सरकारला सादर केला आहे. इंदू मिलची जागा बारा एकर आहे. यातील केवळ 9 टक्के क्षेत्रावर बांधकाम असून उर्वरित जागेवर हिरवळ निर्माण केली जाणार असल्याने इंदू मिलच्या जागेवरील बाबासाहेबांचे स्मारक दादरकरांसाठी ऑक्सिजनचे बेट ठरणार आहे.

आराखड्यानुसार, या ठिकाणी त्यांचा ३६० फुटी भव्य डॉ. आंबेडकर यांचा पुतळा, एक लाख लोकांना सामावून घेईल अशी या नियोजित स्मारकाची रचना असून चार हजार वाहनांच्या पार्किंगची सोय, साढेचार हजार चौरस फुटांची लायब्ररी, ध्यान केंद्र, भव्य वाचनालय यामध्ये असून छोट्या पाच सभागृहांचा यात अंतर्भाव आहे. 10 हजार लोकांच्या भोजनाची येथे व्यवस्था होईल असा खुला मंडप असून, भिक्खू आणि महत्त्वाच्या व्यक्तींना राहण्यासाठी येथे अनेक कक्षांची सोय आहे. बुद्धा पार्क नावाचे मेडिटेशन सेंटर, आकर्षक अँम्पी थिएटर आकर्षणाचा भाग असणार आहे


स्मारकाची मुख्य इमारत पाच मजली आहे. ही इमारत समतेचा संदेश देणार्‍या 'लोटस' सूत्राच्या डिझाईनचे एक कन्व्हेंशन सेंटर असणार आहे. ज्याचा घुमट दिवसा सूर्यप्रकाशाने उजळून निघेल, मात्र रात्री तांबडय़ा दिव्यांमुळे सोन्यासारखा दिसणार आहे. एकूण बारा एकर पैकी केवळ ९ टक्के जागेवरच बांधकाम असून ९१ टक्के मोकळी ठेवण्यात येणार आहे. या मोकळ्या जागेवर ६ डिसेंबर महापारीनिर्वान दिनी व १४ एप्रिल रोजी आंबेडकर जयंती दिनी येणाऱ्या आंबेडकरी अनुयायांच्या राहण्याची सोय करणार केली जाणार आहे.  

राज्य शासनाने इंदू मिलची जागा केंद्र सरकारकडे कडे मागणी केली तेव्हा बारा एकर जागेवर काय करणार असा प्रश्न उपस्थित करत स्मारकचा आराखडा सादर करण्यास सांगण्यात आले होते. सरकारी पातळीवर विलंब झाला असता म्हणून आम्हीच आराखडा बनवून राज्य शासनाला सादर केल्याचे आनंदराज यांनी सांगितले. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी हा आराखडा आपल्याकडे ठेवून घेतला असून या मध्ये पुढे बदलही होऊ शकतो असे आनंदराज यांनी सांगितले.
 ‘स्टॅच्यू ऑफ इक्वॅलिटी’ 
समुद्रात अमेरिकेने उभारलेला स्वातंत्र्यदेवतेचा पुतळा 300 फूट उंच आहे. तो जगातला सर्वाधिक उंच पुतळा असून त्यास ‘स्टॅच्यू ऑफ लिबर्टी’ म्हणून ओळखले जाते. इंदू मिलच्या स्मारकातील बाबासाहेबांचा 360 फुटाचा पुतळा ‘स्टॅच्यू ऑफ इक्वॅलिटी’ म्हणून ओळखला जाईल, असे आनंदराज यांनी सांगितले.

Preamble Of Indian Constitution........

"WE, THE PEOPLE OF INDIA, having solemnly resolved to constitute India into a SOVEREIGN SOCIALIST SECULAR DEMOCRATIC REPUBLIC and to secure to all its citizens: JUSTICE, social, economic and political; LIBERTY, of thought, expression, belief, faith and worship; EQUALITY of status and of opportunity; and to promote among them all FRATERNITY assuring the dignity of the individual and the unity and integrity of the Nation; IN OUR CONSTITUENT ASSEMBLY this twenty-sixth day of November, 1949, DO HEREBY ADOPT, ENACT AND GIVE TO OURSELVES THIS CONSTITUTION"